न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२३) :- इमारतीच्या चौथ्या मजल्यावर बांधकाम आरोपी सुपरवायझ हे काम करत होते. त्या दरम्यान त्यांनी बांधकामाची सुरक्षा व्यवस्था न पुरवल्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या हाताखाली काम करणारा कामगार शुभमकुमार जितेंद्रकुमार सिंह (वय २१ वर्ष) हा चौथ्या मजल्यावरील बॉटल बांधत असताना वरुन खाली पडला.
त्याला डोक्यास मार लागून तो मुत्युमुखी पडला. त्याला आरोपी कारणीभुत झाला आहे. हा प्रकार (दि. १४) रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मौजे च-होली बु, भोई आळी येथे वैभव क्लॉथ सेंटरच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर घडला.
आरोपी दिपक तापकीर (वय ५१, रा. च-होली बु) यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात ५१६/२०२३ भादवी कलम ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि ननावरे पुढील तपास करीत आहेत.


















