- सुदुंबरेसह या ग्रामपंचायतीत निवडणुकीत रंगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२३) :- मावळ तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या १९ ग्रामपंचायतींपैकी बेबडओहोळ, आढले बु. लोहगड व ओव्हळे या ४ ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध झाल्या असून, शिरगाव व पुसाणेच्या सरपंच पदासह काही ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या जागाही बिनविरोध झाल्या असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिली.
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची व ९ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर चार ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, भाजे, सांगिसे, दिवड, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे, आंबळे, डोणे, शिळिंब, साळुंब्रे, उधेवाडी, कोंडीवडे आ.मा., मुंढावरे, मळवंडी ढोरे, कल्हाट या १५ ग्रामपंचायती निवडणूक रंगणार आहे. पोटनिवडणूक असलेल्या ९ ग्रामपंचायतीपैकी नवलाख उंबरे १ जागा, पुसाणे च्या ७ जागा, सावळा ची १ जागा व शिवणेच्या २ जागा अशा एकूण ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर कुसगाव बु. कान्हे, खांडशी व चिखलसेच्या प्रत्येकी १ व दारुंब्रेच्या ३ जागांसाठी निवडणूक होणार आहे.