न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १२ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदार जनजागृती अभियानांतर्गंत ३६ शिरुर लोकसभा मतदार संघातील, २०७, भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात मतदान जनजागृतीपर पथनाटयाचे व चित्ररथाचे उदघाटन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेश्मा माळी व मतदार नोंदणी अधिकारी डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आज सकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तयार केलेल्या या चित्ररथाव्दारे व पथनाटयांव्दारे शहरातील विविध भागात मतदार जनजागृती करण्यात येत असून विविध ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
२०५, चिंचवड विधानसभा मतदार संघ, २०६, पिंपरी विधानसभा मतदार संघ व २०७, भोसरी विधानसभा मतदार संघ या तीन्ही विधानसभा मतदारसंघा मध्ये चित्ररथाव्दारे शहरातील विविध भागात मतदार जनजागृती करण्यारत येत आहे.
अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरुनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त तथा समन्वयक अधिकारी अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, नोडल अधिकारी संजय घुगे, राजेंद्र राणे व रमेश भोसले आदींसह मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.











