न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२३) :- निगडी प्राधिकरण येथील संभाजी चौकाजवळ (दि.०४/११/२०२३ ते १७/११/२०२३) रोजी ब्रिजभवन बंगल्यासमोरील सरकारी वृक्षांवर विद्युत रोषणाई करुन विद्रुपीकरण केले.
याप्रकरणी महापालिकेच्या सहा. उद्यान अधिक्षकांनी संजय तिवारी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी ६६८/२०२३ महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्यासाठीचा अधिनियम १९९५ कलम ३ पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोहवा मोरे पुढील तपास करीत आहेत.