न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२३) :- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश मोरे यांच्या वतीने पिंपरीत रविवारी (दि. १९) रोजी दिवाळी फराळ व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिसरातील मित्र परीवार, ज्येष्ठ नागरीक, राजकीय मान्यवर तसेच पोलीस, डॅाक्टर, पालिका कर्मचारी, पत्रकार मित्र, सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरीक संघ, कोकणस्थ बांधव, कोकणी महिला भगिनी यांच्या भेटीनी फराळासोबत सुरेख मैफिल रंगली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य, मंडळाचे मार्गदर्शक, सल्लागार, सभासद आदींनी परिश्रम घेतले.