- म्हणाले, ‘सरकारला सद्बुद्धी द्यावी हेच साकडं’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २० नोव्हेंबर २०२३) :- मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सद्बुद्धी सरकारला द्यावी, असं साकडं मनोज जरांगे यांनी तुकोबा चरणी घातलं आहे. मनोज जरांगे हे देहू दौऱ्यावर होते. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील कानाकोपरा पिंजून काढण्याचे काम जरांगे करत आहेत.
मनोज जरांगे म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक झालो. मराठा आरक्षणासंदर्भात या सरकारला सद्बुद्धी द्यावी हेच साकडं मी तुकोबा चरणी घातलं. महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आहे. यांना दोन अंग आहेत. क्षत्रिय मराठा आणि शेती करणारा, म्हणजेच कुणबी मराठा. याच माझ्या समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे हेच साकडं मी तुकोबा चरणी घातला आहे. सरकारने शंभर टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे असेही म्हटलं आहे.
देहूच्या प्रवेशद्वारपाशी जेसीबीने फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जरांगे यांनी देहूकरांना एक तास संबोधित केले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुढची दिशा ठरवू. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचे नाही, असे म्हणत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.