न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२३) :- पोलीस दलाशी संबंधित वाहतुकीचे नियमन, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडियाचा वापर, ड्रग्ज व व्यसनाधीनतेपासुन दुर राहणे, महिला व मुलीचा सन्मान करणे, इ. बाबी बाबत शिक्षण देण्याचा हा महत्वाचा टप्पा आहे.
सदरची बाब लक्षात घेता वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड यांचेवतीने ” एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज गुरुवारी (दि. ७) रोजी वाहतूक शाखेमार्फत २० टिमच्या माध्यमातुन निवडलेल्या २० शाळांमधुन सुमारे ७००० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदरचे नियोजन पोउनि, इंगळे, मसहापोउपनि भोसले, पोहवा १५३८ लोखंडे यांच्या वतीने करण्यात आले. यास सर्व शाळा व विदयार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
याउपक्रम विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बापू बांगर पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, कसबे सहायक पोलीस आयुक्त -२ वाहतूक शाखा, देरे सहायक पोलीस आयुक्त-१ वाहतूक शाखा व वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांच्या वतीने आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे जागृत नागरिक असणार आहेत. या विद्यार्थ्यांना विधायक मार्गाने जीवन जगता यावे, यासाठी कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.












