न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२३) :- मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुनावळे व ताथवडे अंडरपासमार्गे अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या जटिल वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त बापू बांगर यांनी नुकतेच याबाबत आदेश काढले आहेत.
दरम्यान, पुनावळे, ताथवडे अंडरपासच्या दुतर्फा मोठमोठे टॉवर, आस्थापना, विविध शोरुम्स तसेच, रहिवासी सोसायट्यांचे जाळे उभे राहिले आहे. या अंडरपासमार्गे पुनावळे, ताथवडे, जांबे, नेरे, पांढरे वस्ती आणी आयटीपार्क परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे दिवसरात्र या अंडरपासमधून वाहनांची मोठी वर्दळ असते. प्रामुख्याने आयटी पार्कच्या घाईगर्दीच्या वेळेस तर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने नागरिक हैराण झाले होते.














