न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- सिंगापुर येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीमार्फत टुरला नेतो, असे सांगुन आरोपीने दोघांकडुन ७०,२०० रुपये प्रत्येकी असे एकूण १,४०,४०० रुपये घेवून त्यांना सिंगापुरला टूरला न नेता त्यांची फसवणुक केली आहे.
ऑगस्ट २०२३ ते आजपर्यंतच्या कालावधीमध्ये ऑनलाईनद्वारे इंद्रायणी नगर भोसरी येथे हा प्रकार घडला. महिला फिर्यादीने आरोपी अनोळखी इसम प्रकाश सावंत (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६६२/२०२३ भादवि कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ चे कलम ६६ डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि एस एस पांचाळ पुढील तपास करीत आहेत.














