न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२३) :- नव वर्षाचे स्वागत केल्यानंतर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३२२ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत २१ लाखांचा दंड वसूल केला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४० ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.
नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणे, रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली. मुख्य चौक, अंतर्गत रस्ते तसेच महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यातील मद्यपान करणाऱ्या चालकांवर कारवाई केली.
पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे…
ड्रंक अँड ड्राईव्ह – ३२२
आरोपी चेकिंग – ४१५
वाहने चेकिंग – २४२५
अवैध धंदे कारवाई – १०
आस्थापना चेकिंग – ४७३
अवैध धंदे कारवाईमधील जप्त मुद्देमाल – २,०९,८७५
वाहनांवर केलेल्या कारवाईच्या दंडाची रक्कम – २०,६०,८००













