न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२३) :- तळेगाव दाभाडे येथे रविवारी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. सकाळी देहू येथे विठ्ठल मंदिरात अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर भंडारा डोंगर येथे त्यांनी दर्शन घेतले. अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी महापौर संजोग वाघेरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, शिवाजीराव पवार, बाबूराव वायकर, अशोक काळोखे, नितीन मराठे, बाळासाहेब घोटकुले, सचिन घोटकुले, संतोष भेगडे, सागर पवार, आमदार बाळा भेगडे, स्नेह ग्रुपचे संस्थापक संदीप भेगडे, उद्योजक दत्तात्रय पवार, तुषार ठाणेकर, गोपीचंद गराडे आदी उपस्थित होते.
यावेळी मावळ तालुक्यातील नागरिकांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, बाळा भेगडे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील अनेक नेत्यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.













