- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२३) :- तीर्थक्षेत्र सुदुंबरेत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी (दि. ०३) रोजी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (दि. ०९) रोजी सकाळी ११.०० वाजता श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त सोहळ्यास उपस्थिती दर्शविणार आहेत.

सोहळ्यानिमित्त पालखी रथाला चकाकी देण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात भव्य स्टेज उभारणीचे काम सुरु आहे. महाप्रसादासाठी देखील वेगळी सोय करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. दररोज अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. बुधवारी (दि. १०) रोजी काल्याच्या कीर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रामदास तडस खासदार वर्धा लोकसभा, आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव, विभागीय आयुक्त सौरभ राव, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, खा. श्रीरंग बारणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. अॅड. अशोक बापु पवार, आ. महेशदादा लांडगे, आ. अश्विनीताई जगताप, आ. अतुल बेनके, आ. बापुसाहेब पठारे, भाजपा अध्यक्ष पुणे जिल्हा अतुल देशमुख, सुनिल (आण्णा) शेळके आमदार मावळ विधानसभा, किरण इंदलकर जिल्हा नियोजन अधिकारी पुणे, ईश्वर बाळबुधे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, अॅड. वंदनाताई चव्हाण खासदार राज्यसभा, संदीप क्षीरसागर (आमदार बीड), दिलीप मोहिते पाटील (आमदार खेड), सुनिल आण्णा टिंगरे (आमदार वडगावशेरी), आण्णा बनसोडे (आमदार पिंपरी), जगदिश मुळीक (मा. आमदार वडगाव शेरी), अजित गव्हाणे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर), उत्सव अध्यक्ष सौरभ सुर्यकांत भागवत, इंदोरी, उत्सव उद्घाटक सौरभ संजय रत्नपारखी, चाकण, निमंत्रक नारायण दिगंबर क्षिरसागर अध्यक्ष, श्री. संताजी महाराज पालखी सोहळा आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.













