- इमारतीचे देखील केले मोठे नुकसान; नागरिकांची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२३) :- चऱ्होलीतील तनिष पर्ल या इमारतीच्या तळमजल्याच्या पार्किंगमध्ये (दि.०५ ते दि.०६) रोजी पहाटे १.१५ वाजेच्या दरम्यान आरोपीने दुचाकीचा पेट्रोल पाईप काढुन वाहनांना आणि राहत्या इमारतीचे नुकसान करण्याच्या इराद्याने जाणीवपुर्वक पेट्रोलने आग लावली.
फिर्यादी व फिर्यादी यांचे मित्र यांची एकुण १०,४०,००० रुपये किंमतीची मारुती सुझुकी इर्टिंगा, पॅशन प्रो, मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा कार, पल्सर, स्पेंडर, व इमारतीचे प्लास्टर, ड्रनेज पाईपलाईन यांचे जाळुन नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी नितीन शिवाजी जवक यांनी आरोपी देवेंद्र गोपाळ तापकीर याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. दिघी पोलीस ठाण्यात १०/२०२४ भादवी कलम ४३६ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. उपनिरीक्षक बी.एच. शिखरे पुढील तपास करीत आहेत.













