न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२४) :- निगडीतील अण्णाभाऊ साठेनगरमध्ये होणाऱ्या दुबार एसआरएच्या नियोजित सर्व्हेला स्थानिक रहीवासी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वसाहत से.न. २२ बचाव कृती समितीने विरोध व निषेध करण्यासाठी नियोजन बैठक आयोजित केली होती.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बापूसाहेब गायकवाड, संजय भालेराव, सुरज गायकवाड, बसवराज नाटेकर, सुलतान तांबोळी, सनी पवार, सुशील गवळी, शुभम कांबळे आदी उपस्थित होते.













