- मेट्रो आर्थिंगसाठी लावण्यात आलेल्या अॅल्यूमिनियमच्या पट्ट्यांची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकासमोरील पीसीएमसी मेट्रो स्टेशन खाली असलेल्या पिंलर क्रमाक ०९. येथे तीन अनोळखी महीला आर्थिंगसाठी लावण्यात आलेल्या अॅल्यूमिनियमच्या पट्ट्या काढत असल्याचे पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यांनी एकूण सहा हजार रुपयांच्या पाच अॅल्यूमिनियमच्या पटटया चोरी केल्या.
तसेच पुन्हा पिलर क्रमाक ०९ येथे तीन अनोळखी महिला अॅल्यूमिनियमच्या पटटया काढत असल्याचे दिसले. त्या महीलांना हटकले असता त्या तेथून पळून गेल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
कल्याणराव दौलतराव विधाते यांनी तीन अनोळखी महीलांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात २१/२०२४ भा.दं. वि. कलम ३७९,५११, ३४. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा बारशिंगे तपास करीत आहेत.













