न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२४) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बांधकाम व्यावसायिक राजु सांकला, श्री कृष्णकुमार गोयल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्या या दिनदर्शिकेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या विकसित भारतची महत्वपूर्ण घडामोडी मतदारसंघातील जनमानसात पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.














