न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२४) :- स्कुटीवरून संशयितरित्या येवुन बंगल्याची रेकी करून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडुन घरफोडीचे एकुण १८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ४५,३३,४०० रुपये किंमतीचे १ किलो ७ तोळे २ ग्रॅम सोने, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली दुचाकी महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी जप्त केली आहे.
चिंबळी फाटा ते कुरुळी गावाकडे जाणाऱ्या रोडवर डोंगरवस्ती (दि. ०२) रोजी आरोपीचा शिताफीने पाठलाग करुन त्याला अटक करण्यात आली आहे. आमिर शब्बीर शेख (वय २५ वर्षे, रा. निगडी प्राधिकरण, मुळगाव वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले २९,०३,४०० रुपये, ४७.८ तोळे वजनाचे सोने, त्यात सोन्याचे गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, अंगठया कानातील कर्णफुले जोड, बांगडया, ब्रेसलेट, कडे व रोख रक्कम ३,००,००० लाख रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
सखोल कौशल्यपुर्वक तपास करता त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये येलवाडी, सुदुंबरे, इंदोरी, तळेगाव दाभाडे, मोशी, चिखली परिसरात घरफोडी केल्या असल्याचे सांगितले. चोरी करताना रस्त्यालगत असणाऱ्या बंगल्याची रेकी करुन बंगले लॉक असताना व त्यातील लाईट बंद असल्यास बंगल्याच्या पाठीमागील खिडकीचे गज कापुन आतमध्ये प्रवेश करुन बंगल्यात चोरी करत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, प्रदिप गायकवाड, दिनेश चव्हाण पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, राजु जाधव पोना संतोष काळे, किशोर सांगळे, पोकों/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे.














