न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२४) :- ‘शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा फ़ायदा’ असे अमिष देवून फ़सवणूक करणा-या ठगास वडनगर, गुजरात येथून चिखली पोलीसांनी बेडया ठोकल्या असून १५ लाख ४० हजार रुपये फिर्यादीस परत. देण्यात आले आहेत.
मे २०२३ मध्ये चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका प्रतिष्टीत व्यक्तीस फ़ोन करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणात नफ़ा मिळत असल्याच्या योजना सांगुन त्याचा विश्वास संपादित केला. त्यानुसार फ़िर्यादी यांनी प्रथमत: रु.५० हजाराची गुंतवणुक केली. त्याच्या मोबदल्यात त्यांना सव्वा लाखाचा नफ़ा झाल्याचे दर्शविण्यात आले व पुन्हा गुंतवणुक करण्यास प्रोस्ताहित करण्यात आले. तसेच फ़िर्यादी यांना डी मॅट अकाउन्ट काढून देण्याचे आश्वासन करुन गुंतवणुक करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. तसेच चेतन पटेल व संजय पटेल यांचे मार्फत ट्रेडींग करा असे सांगुन फ़िर्यादीस वेळोवेळी गुंतवणुक करण्यास भाग पाडुन आरोपीने फिर्यादी यांना वेळोवेळी तुमचा तोटा झाला आहे तो तुम्ही पैसे भरा, पैसे भरले नाही तर पोलीस केस होइल अशी धमकी देवुन फिर्यादी यांची एकुण १५,४७,२५९ रुपयांची फसवणूक केली होती. फ़िर्यादीने खात्री केल्यानंतर त्याना त्याचे नावाने डी मॅट खातेच नसल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यानी दिलेल्या तक्रारीवरुन चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ३४१/२०२३, भादवी कलम ४२०, ४०६ प्रमाणे दिनांक २०/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हयाचे तपासात चिखली पोलीस स्टेशनचे तपास पथकाने संभाषणासाठी वापरण्यात आलेले फ़ोन, फ़िर्यादीने पैश्याचे व्यवहार करताना वापरलेली बँक खाती हयाचे तांत्रीक दृष्टीने विश्लेषण करुन सदर गुन्हा हा दिनेशजी पथुजी ठाकोर वय २६ वर्षे धंदा नोकरी रा. मु.पो. छाबलीया ता. वडनगर जिल्हा मेहसाना राज्य गुजरात याने केला असल्याचे हा करत असल्याचे निष्पन्न करण्यात यश मिळवले.
आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे व तो हॉटसअप वर संपर्कात राहत असल्याने त्याचे लोकेशन मुंबई, सुरत, अहमदाबाद, गुजरात अश्या वेगवेगळ्या ठिकाणी येत होते त्यामुळे आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलीसासमोर होते. तांत्रीक तपासाचे अधारावर आरोपी हा त्याचे मुळ गावी गुजरात या ठिकाणी पळून गेलेला असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक मोगले व पोहवा/गोडांबे, पोहवा/मोहीते यांचे पथक गुजरात या ठिकाणी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक मोगले व स्टाफ यांनी कौशल्यापुर्वक तपास करुन आरोपीत याचा शोध घेवुन त्यास वडनगर जिल्हा मेहसाना राज्य गुजरात या ठिकाणाहून ताब्यात घेवुन चिखली पोलीस स्टेशन येथुन ताब्यात घेण्यात यश मिळवले. आरोपीत यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली देवून त्याने फसवणुक केलेले १५,४७,२५९/-रुपये हे त्याचे नातवाईकाकडे ठेवलेली असल्याचे सांगितले. त्यास दाखल गुन्हयात अटक करुन मे. कोर्टात हजर केले असता मे. कोर्टात आरोपीचे नातेवाईकांनी त्याच्याकडे आरोपीने ठेवलेले पैसे फ़िर्यादीस परत करत असल्याचे कथन केल्यावरुन कोर्टाने आरोपीचे नातेवाईकाना दोन दिवसाची मुदत दिली. मुदतीत नातेवाईकानी फ़सवणूक झालेली पूर्ण रक्कम फ़िर्यादीस परत केल्याने फ़िर्यादीने पोलीसांचे अभार मानले.
सदरची कामगिरी संदीप डोईफोडे पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, विवेक मुगळीकर, सहा. पोलीस आयुक्त, एम आय डी सी विभाग, ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगले व पोहया/गोडांबे, पोहवा/मोहीते यांनी यशस्वीरित्या पार पाडली.














