न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२४) :- कंपनीच्या स्टोरोज गोडावूनमधुन सात ते आठ टन वजनाचा चौकोनी आकाराचा ब्रॉयलर प्रेशर पार्ट बाहेर काढून क्रेनद्वारे गाडीमध्ये लोडींग करीत होते. त्या दरम्यान क्रेनवरील आरोपी चालकाला रस्त्यावरील विद्युत वायरचा अंदाज न आल्याने त्याने क्रेन निष्काळजीपणे हाताळली.
जॉब बाहेर घेताना क्रेन ही विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने त्यातून विद्युत तारा जॉबमध्ये उतरून जॉब पकडलेला कामगार जिलाजीत (वय-२३ वर्षे) यास विजेचा धक्का लागून क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ४/०३/२०२३) अतुल इंडस्ट्रीज प्रिमायसेस, तळवडे येथे घडली. आरोपी आलोक कुमार महतो (वय – ३३ रा- तळवडे) याच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात २३/२०२४, भादवि कलम ३०४ (अ) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि नाले तपास करीत आहेत.