- विनयकुमार चौबे यांच्या हस्ते वाकड नुतन कक्षाचे उद्घाटन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२४) :- सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारीचे निवारण तात्काळ होण्यासाठी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सर्व सामान्य नागरीकांना सहज उपलब्ध व्हावे. त्यामुळे नागरीकांच्या तक्रारीचे निवारण लवकर होईल. नागरीकांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी सुसंवाद होईल. याच दुरदृष्टीकोनातुन पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते नुकतेच वाकड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नुतन कक्षाचे उद्घाटन पार पडले.
या उद्घाटन सोहळयास अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त बापु बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे व वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
वाकड पोलीस ठाण्यात आल्यानंतर अगदी सहज दृष्टीक्षेपात पडेल, असे हे कक्ष नागरीकांसाठी आता खुले झाले आहे. निश्चीतपणे हा प्रयत्न नागरीक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सुसंवादाचा एक दुवा असणार आहे, असे मत पोलीस आयुक्त चौबे यांनी व्यक्त केले.














