- दोन कारवायांमध्ये तब्बल सव्वा कोटींपेक्षा अधिकचा माल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- एकाच दिवशी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (दि. १२) रोजी दोन कारवाईमध्ये एकुण १,३१,५५,३०० रुपये किंमतीचा एकुण ९६ किलो ०८७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, एक शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार व दोन अॅम्ब्युलन्स जप्त करुन त्यातील माल देणारे व माल घेणाऱ्या आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची साखळी नष्ट केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपुनछपुन होणारी अंमली पदार्थाची विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हस्के वस्ती येथे बी.आर.टी. रोडच्या कडेला पोलिसांनी १) कृष्णा मारुती शिंदे, (वय २७ वर्षे, रा. शिंदेवस्ती, शितपुर, ता. कर्जत, जि. अहमदनगर), २) अक्षय बारकु मोरे (वय २९ वर्षे, रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व ३) हनुमंत भाऊसाहेब कदम (वय ३५ वर्षे, रा. कुसडगाव, एस.आर.पी.एफ. सेंटर जवळ, ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन एकुण ३०,५५,७०० रू. किं. चा माल त्यामध्ये २५,६९,१०० रुपये किंमतीचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, एक सफेद रंगाची शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार, ०४ मोबाईल व १,६०० रुपये रोख रक्कम असा माल जप्त केला. त्यांनी सदरचा गांजा हा इ देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे (वय ३२ वर्षे रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव) याचेकडुन आणला. सदरचा गांजा हा सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) यास विकणार असल्याचे सांगीतल्याने त्यांचे विरुध्द रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
त्यानंतर दाखल गुन्ह्याच्या तपासात पाहिजे आरोपी देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे हा उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन त्यास उंडेगाव धाराशिव येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण ५०,२०,००० रु. किं. चा ५० किलो २०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने जप्त केला आहे. तसेच सदर गांजा हा सौरव निर्मल, रा. रुपीनगर, चिखली, पुणे यास विकण्यासाठी आणल्याने व सदर आरोपी अॅम्बुलन्समधुन गांजा वाहतुक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन दोन अॅम्बुलन्स जप्त केल्या आहेत.
तसेच (दि. १३) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नाशिक हायवे रोड लगत, कुरुळी स्माशानभुमी ते अमर कांबळे यांची कात्रज दुध डेअरीकडे जाणा-या इंद्रायणी पार्क समोरील सर्व्हिस रोडवर कुरुळी ता. खेड जि.पुणे येथे १) सन्नीदेवल सिध्दनाथ शर्मा (वय २१ वर्षे रा. दिगंबर मोरे यांचे रुममध्ये अॅपेक्स गोडावुन समोर पुणे नाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता. खेड जि. पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि. सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश) व २) सन्नीदेवल भगवानदास भारती (वय २३ वर्षे रा. दिगंबर मोरे यांचे रुममध्ये अॅपेक्स गोडावुन समोर पुणे नाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता.खेड जि. पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि. सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन एकुण २०,७९,६०० रु. किं. चा माल त्यामध्ये २० किलो १९६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईलसह जप्त केला आहे. त्यांनी सदरचा गांजा हा उत्तरप्रदेश येथुन राजेश कुमार रा. घोरावल जिल्हा सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश याचेकडुन आणला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
हि कामगीरी पोलीस आयुक्त, विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोउपनि श्री. ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार सहा. पोलीस फौजदार बाळासाहेब सुर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदिप शेलार, पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, पोलीस नाईक विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे व पाडुरंग फुंदे यांनी केली आहे.

















