- आदित्य ठाकरेंकडून महत्वाचं सुतोवाच…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२४) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची रविवारी पिंपरीत सभा झाली. सभेनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्या महिन्यात प्रवेश केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘संजोग वाघेरे यांनी संघटक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे. लोकसभा वा विधानसभेच्या उमेदवारीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेते घेत असतात. तिकिट वाटपात मी जात नाही. पण, केवळ मावळच नाही तर, राज्यातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदारसंघ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या दोन वर्षात खूप अन्याय महाराष्ट्र सहन करत आहे.
‘इंद्रायणी नदी प्रदूषणबाबत बोलताना ते म्हणाले शहरात नागरीकरण वाढत आहे. ‘इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व विभागांची सांगड घालणं गरजेचे आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या खात्याविषयीच फारसी माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली.













