- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, प्रशासन अधिकारी व कार्यालय अधीक्षक यांच्या जबाबदा-यांमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने हे बदल करण्यात आल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी पदाचे अतिरिक्त काम देण्यात आले आहे. करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडील मतदार नोंदणी अधिकारी पदाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात काढून घेण्यात आले आहे. तर, ब क्षेत्रीय कार्यलयाचे प्रशासन अधिकारी अमित पंडीत यांच्याकडे ग क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभारी क्षेत्रीय अधिकारी म्हणून अतिरिक्त पद्भार देण्यात आला आहे. सहायक आयुक्त विनोद जळक यांच्याकडील ग क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज ठेवण्यात आले आहे.
प्रशासन अधिकारी सुचिता पानसरे यांच्याकडे अ क्षेत्रीय कार्यालयाचा प्रभारी क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी अंकुश जाधव यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी पदाचे कामकाज देण्यात आले आहे. प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागासोबत अ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. कार्यालय अधिक्षक संजीव भांगले यांच्याकडे वायसीएम रूग्णालयाचे प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून कामकाज दिले आहे. नगररचना विभागाचे काम न त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. कार्यालय अधीक्षक मीनाक्षी गरूड यांच्याकडे स्थापत्य मुख्य कार्यालयासह नगररचना विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.











