न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२४) :- अनेक वर्षे रखडलेल्या शिंदे वस्ती, रावेत येथील उड्डाण पुलाचे अपूर्ण काम अखेर पूर्ण झाले आहे. तसेच, पुलाखालील सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. त्या संदर्भात स्थापत्य प्रकल्प विभागाचे आयुक्तांना काम पूर्ण झाल्याचे पत्र दिले आहे. रस्ता वाहतुकीस खुला करण्याबाबत ते निर्णय घेणार आहेत.
जागा ताब्यात न आल्याने तब्बल आठ वर्षापासून रावेत येथील रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे अर्धवट स्थितीत हा पूल होता. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पुलाचे उर्वरित काम एप्रिल २०२३ ला सुरू करण्यात आले. एकूण १६५ मीटर लांबीचा उड्डाण पूल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले.
हे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. तसेच, पुलाखालील सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्याचे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे, असे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.











