न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२४) :- मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सर्वेक्षणात अडथळ्याची शर्यत दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
सर्व्हर डाऊन होणे, लाॅगइनसह अनेक तांत्रिक अडचणी येत असून एका कुटुंबाची माहिती घेण्यास २० मिनिटांचा वेळ लागत आहे. दरम्यान, सर्वेक्षण कामाला दांडी मारणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांना महापालिकेने नोटीसा बजाविल्या असून चोवीस तासात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा निलंबन करण्याचा इशारा दिला आहे.











