- चाकण चौक ते इंद्रायणी हॉस्पीटलपर्यंतच्या रस्त्यावर वाहतुकीस मनाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) :- आळंदीमध्ये (दि. ०४ ते दि. ११) ‘गीता भक्ती अमृत महोत्सव’ कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यासाठी व्हीआयपीसह दररोज ३० ते ३५ हजार भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच व्ही.आय.पी बंदोबस्ताच्या अनुषंगाने दिघी आळंदी वाहतूक विभाग हद्दीतील मार्गावर वाहनांसाठी काही रस्ते बंद करण्यात येणार आहेत.
दरम्यान चाकण चौक ते इंद्रायणी हॉस्पीटलपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात वाहने पार्किंग/थांबवण्यास वाहतूक विभागाकडून मनाई करण्यात आली आहे. (दि.०४) रोजी सकाळी ००.०० ते (दि. ११) रोजी रात्री १२.०० वा पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल (अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड, पेट्रोल, डिझेल टैंकर, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस, वगळून) आवश्यकते नुसार करण्यात आले असून, नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे…
दिघी आळंदी/चाकण वाहतूक विभाग अंतर्गत इंद्रायणी घाट ते चाकण चौक जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. पर्यायी मार्ग- इंद्रायणी नगर कमान काटे पाटील चौक नवीन पुल मार्ग इच्छित स्थळी जातील. इंद्रायणी नगर कमान ते काटेपाटील चौक एकेरी वाहतूक सुरु राहील. काटे पाटील चौक ते इंद्रायणी घाट मेन रोड सर्व वाहनांना प्रवेश बंद. पर्यायी मार्ग – काटे पाटील चौक नवीन पुल मार्गे इच्छित स्थळी जातील. घुंडरे पाटील चौक ते बापदेव चौक सर्व वाहनांना बंदी राहील. पर्यायी मार्ग- १. इंद्रायणी हॉस्पीटल मार्गे २. गोपाळपुरा मार्गे ३. चाकण चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. चिंबळी फाटा चौक, चाकण येथुन आळंदी कडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील. पर्यायी मार्ग १. भारतमाता चौक हवालदार वस्ती देहूफाटा चौक च-होली फाटा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. २. जयगणेश साम्राज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. आळंदी फाटा चौक, चाकण येथुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील. पर्यायी मार्ग – १. भारतमाता चौक- हवालदार वस्ती देहूफाटा चीक चहोली फाटा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील २. जयगणेश साम्राज्य चौक खडी मशीन रोड अलंकापुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. माझगाव फाटा चौक, येथुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील. पर्यायी मार्ग – १. भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. देहूफाटा चौक कडुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील. पर्यायी मार्ग – १. हवलदार वस्ती मार्गे इच्छित स्थळी जातील. २. चहोली फाटा मागें इच्छित स्थळी जातील. चाकण शिक्रापुर रोड, रसिका हॉटेल येथुन आळंदीकडे येणारे सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंदी राहील. पर्यायी मार्ग – १. शिक्रापुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. २. चाकण मोशी मार्गे इच्छित स्थळी जातील. ३. कोयाळी मरकळ मार्गे इच्छित स्थळी जातील.