- पिंपरी चिंचवड वकील संघटनेची बार कौन्सिलकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याची मागणी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार अससोसिएशनच्या वतीने करण्यात आली असून शहरातील वकिलांचे विविध प्रश्न सोडविण्याचे निवेदन पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने बार कौन्सिलला देण्यात आले आहे.
अॅडव्होकेट्स प्रोटेक्शन अॅक्ट तात्काळ मंजूर झाला पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनात पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनमधील ज्येष्ठ वकील, माजी अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष व कमिटी यांनी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
पिंपरी बारसह महाराष्ट्रातील अनेक वकील संघटनेच्या वतीने न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांच्यासाठी महत्वाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने वकील संरक्षण कायदा व पिंपरी चिंचवडमधील वकिलांचे विविध प्रश्न घेऊन बार कोन्सिलचे ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अॅड. पारिजात पांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अॅड. विठ्ठल देशमुख, अॅड. गजानन चव्हाण, अॅड. अविनाश भिडे, अॅड. संग्राम देशमुख, अॅड. सुदीप पासबोला उपस्थित होते.
दरम्यान पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. एस. बी. चांडक, अॅड. किरण पवार, विद्यमान अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले यांनी बार कौन्सिलच्या सदस्यांसमोर वकिलांचे विविध प्रश्न मांडले. वकील संरक्षण कायदा, ई- फायलिंग संदर्भातील अडचणींबाबत निवेदन दिले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. प्रतीक्षा खिलारी, सचिव अॅड. धनंजय कोकणे, महिला सचिव अॅड. मोनिका सचवणी, सहसचिव अॅड. उमेश खंदारे, ऑडिटर अॅड. संदीप तापकीर, सदस्या अॅड. मिनल दर्शीले, अॅड. मंगेश खराबे, अॅड. मानसी उदासी, अॅड. विवेक राऊत, अॅड. शंकर घंगाळे, महिला सचिव अॅड. मोनिका गाढवे, अॅड. रामहरी कसबे, अॅड. चेतन सुखेजा, अॅड. नरसिंह इंगळे आदी उपस्थित होते.

















