न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे आयुक्तांनी महत्वाच्या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. कामकाज जलद गतीने होण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यांच्याकडे कायदा, आपत्ती व्यवस्थापन या विभागांसह कामगार कल्याण विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग आणि नागरी सुविधा केंद्र या विभागांच्या कामकाजाचे संपूर्ण नियंत्रण सोपविण्यात आले आहे.













