- उडीसात ड्रायव्हर चालक-मालकांची महासभा संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- हिट अँड रन कायद्याविरोधात तसेच आपल्या विविध मागण्यासाठी लढा द्यायला देशभरातील चालक सज्ज झाला आहे. ड्रायव्हर जोडो यात्रेला पाठिंबा देत आहे. चालकांच्या एकीच्या आणि पाठिंब्याच्या जोरावर हिट अँड रन कायदा मागे घ्यायला भाग पाडू, असा निर्धार ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
उडीसा ड्रायव्हर महासंघाच्या वतीने ओडिशा जजपूर येथे आयोजित ड्रायव्हर चालक-मालकांच्या महासभेमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उडीसा ड्रायव्हर महासंघाचे अध्यक्ष प्रशांत मंडोली हे होते. यावेळी सूमिर अंबावत, मनोज साहू, गुलजार सिंग, प्रीतम सिंग, पूपेंद्र यादव, आदित्य प्रसाद, चैतन्य प्रसाद,श्रीनिवास राव, मानस देवता, ओवकास, दिलीप साहू, बुधिया महापत्रा आदी उपस्थित होते.
हिट अँड रन कायद्याविरोधात तसेच देशभरातील चालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारतभर ड्रायव्हर जोडो यात्रा सुरू आहे. दिल्ली पंजाब नंतर उडीसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगाना, कर्नाटक आदी दक्षिणेतील राज्यांमध्ये या यात्रेला चालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत दिल्ली येथेल बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देण्याची ग्वाही चालक देत आहे.
हिट अँड रन या कायद्या विरोधात चालकांच्या प्रश्नासाठी आणि हक्काच्या मागण्यासाठी बाबा कांबळे यांनी भारत डायव्हर जोडो यात्रा सुरू केली असून आज यात्रा उडीसा येथील जयपुर येथे पोहोचले असता या ठिकाणी भव्य असा महामेळावा घेण्यात आला. हिट अँड रनचा काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा. देशातील सर्व ड्रायव्हर चालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा. सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा. दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे आदी मागणीसाठी बाबा कांबळे चालकांमध्ये जनजागृती करून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशव्यापी स्वरूप येत आहे. ओडिशा जजपुर येथील महासभेत सहभागी होत बाबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उडीसा ड्रायव्हर महासंघाचे अध्यक्ष प्रशांत मंडोली म्हणाले, उडीसामध्ये आम्ही परिवहन विभागाचे अंतर्गत ड्रायव्हरसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पडले असून या माध्यमातून चालकांचे प्रश्न सुटत आहेत. आम्ही ओडिसामध्ये सक्षम संघटन उभे केले असून आमचे प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवत आहोत परंतु देशपातळीवरती देशातील २५ कोटी चालक-मालक ड्रायव्हर यांच्याट संघटन होणे आवश्यक असून या दृष्टीने देशभरामध्ये कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. परंतु, बाबा कांबळे मात्र एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी देशव्यापी भारत ड्रायव्हर जोडो यात्रा काढून देशातील चालक-मालकांचे प्रश्न समजून घेतले. यामुळे आम्ही त्यांच्यासोबत असून बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे आम्ही काम करू, असे प्रशांत मंडोली म्हणाले.











