न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२४) :- सामाजिक उन्नतीच्या दिशेने पाऊले टाकण्याचा निर्धार करीत स्थापन झालेल्या रयत स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पुण्यातील माजी सैनिक मारुती कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच मारुती कांबळे यांना बहाल केले आहे. देशसेवा आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाची दखल घेऊन संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.
प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीबद्दल नुकताच संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मारुती कांबळे यांचा सत्कारही करण्यात आला. त्यावेळी संघटनेचे सरचिटणीस रविराज बबन काळे, प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे, पिंपरी चिंचवड कामगारा आघाडी शहराध्यक्ष महेंद्र सदाशिव शिंदे, कुणाल गोरडे, प्रकाश घोडके, आदींची प्रमुख उपस्थिती होती. या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे आदींनी अभिनंदन केले. प्रदेश उपाध्यक्षपदाचा सन्मान दिल्याबद्दल मारुती कांबळे यांनी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.











