न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२४) :- लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे. आज शनिवारी दुपारी तीन वाजता देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय उत्सवाचा प्रारंभ कधी होणार? निवडणूक किती टप्प्य्यांत होणार हेदेखील कळणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
देशभरात निवडणुकीचा उत्साह दिसून येतो आहे. प्रचारसभा आणि रॅली यांचा उत्साह दिसून येईल. आता किती टप्प्यात निवडणूक लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्मही आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने तिसऱ्यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं म्हटलं आहे. निवडणूक आयोग आता किती टप्प्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करतात आणि निकालाची तारीख काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.











