- पुणे, मावळ, शिरूरपासून मतदानासाठी बारामती मतदारसंघ केला वेगळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२४) :- पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यामध्ये आता दोन टप्प्यांत मतदान होईल. बारामतीमध्ये पवार घराण्यात रंगणाऱ्या लढतीसाठी ७ मे (सोमवारी) रोजी मतदान होईल. पुणे, मावळ, शिरूर या लोकसभा मतदारसंघांसाठी १३ मे (सोमवार) रोजी मतदान होणार आहे. ऐन उन्हाच्या तडाख्यात चारही लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. ४ जूनला या चारही मतदारसंघांचे निकाल जाहीर होतील.
जिल्ह्यात प्रथमच असे दोन टण्यांत मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, तसेच अन्य सरकारी खात्यातील कर्मचारी मतदार पडेपर्यंत काम करतात. भलीमोठी सरकारी यंत्रणा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंत कार्यरत असते. दोन टप्प्यांत मतदानाचा प्रशासनाला फायदा व तोटा असे दोन्हीही होईल, असे अधिका-यांचे म्हणणे आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते. वैद्यकीय तक्रारी, आजारपण, औषधे, तपासण्या, कौटुंबिक कार्यक्रम तर अधिकारीही निवडणुकीचे काम टाळण्याचा प्रयत्न करतात. वैद्यकीय प्रमाणपत्र दिले की, त्यांना नाहीही म्हणता येत नाही. त्यामुळे अनेकदा खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचारीही मतदान केंद्रांवर कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात येतात.
आता दोन टप्प्यांत मतदान होणार असल्याने वरिष्ठ स्तरावरील काही अधिकाऱ्यांना ७ मे (सोमवारी) बारामतीमधील मतदानप्रक्रिया संपली की १३ मे साठी दुसऱ्या ३ मतदारसंघांमध्ये नियुक्त करता येणे शक्य होणार आहे. विशेषतः पोलिस प्रशासनासाठी दोन टप्प्यांचा चांगला उपयोग होणार आहे, असे काही अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले.











