न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२४) :- दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना निगडी पोलिसांनी अटक केली असून, इतर दोघांवर गुन्हा दाखल आहे. ही कारवाई निगडीतील ओटास्कीम स्मशानभूमी येथे करण्यात आली.
गणेश तुकाराम सांगोळकर (वय २३, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी), चंद्रकांत अंकुश चव्हाण (वय ३६, रा. रुपीनगर, तळवडे), विनोद शिवशरण हिप्परीकर (वय ३५, रा. ओटास्कीम, निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रकाश चंद्रकांत धोत्रे (रा. रुपीनगर, तळवडे), पंचू तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ओटास्कीम स्मशानभूमी येथे काहीजण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिस आल्याचे समजताच त्यांचे दोन साथीदार अंधारात पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे दोन गावठी कट्टे, मिरचीपूड, रिक्षा असा एकूण ६४ हजारांचा मुद्देमाल सापडला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.