न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२४) :- पिंपरी न्यायालयात ई फायलिंग व सुविधा केंद्र, मेडिएशन सेंटर व उपहारगृहाचा उद्घाटन सोहळा बुधवारी संपन्न झाला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन, पिंपरी-चिंचवडचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश राजेश वानखेडे, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सोनल पाटील, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. अहमद पठाण सदस्य, पुणे जिल्हा ई फाइलिंग प्रमुख ॲड. पृथ्वीराज थोरात, नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. गजभिये, आर. एम. गिरी, बी. डी. चौखंट, एम. जी. मोरे, पी. सी. फटाले, ए. एम. बगे, एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड, ॲड. अतिश लांडगे, ॲड. किरण पवार, ॲड. सुदाम साने आदि उपस्थित होते.
न्यायालयाचे कामकाज स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी ई फायलिंग ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. वकील आणि पक्षकारांना ऑनलाईन माध्यमातून सर्व दावे दाखल करावे लागत आहेत. वकील व पक्षकारांना मदत मिळण्यासाठी ई फायलिंग व सुविधा केंद्राची मदत होणार आहे. मोरवाडी येथून नेहरूनगर येथे मागील वर्षी न्यायालयाचे स्थलांतर झाले आहे. तिथे उपहारगृह अद्याप सुरु नव्हते. त्यामुळे बार असोसिएशनने पुढाकार घेऊन याचेही उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले पाटील, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, खजिनदार ॲड. अजित खराडे, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अय्याज शेख, ॲड फारुख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड अस्मिता पिंगळे, ॲड. मीनल दर्शले, ॲड. स्वाती गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले. उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी यांनी आभार मानले.















