न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- जबरी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी पिस्तुल व तीन काडतुस जप्त केली आहेत. ही कारवाई खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे करण्यात आली आहे.
निखिल नंदु बोत्रे (रा. खालुंब्रे ता. खेड जि. पुणे), तसेच त्याचा साथिदार प्रशांत ऊर्फ बफन धर्मा लांडगे (रा. खराबवाडी ता. खेड जि पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांनी (दि. २२) कामगाराला खालुंब्रे बाजारपेठ येथे आडवुन त्याच्या खिशातील पैशांची मागणी केली होती. खिश्यातील १५००/- रुपये बळजबरीने काढुन घेत निखिल बोत्रे याने त्याच्या खिश्यातुन एक देशी पिस्तुल काढले लोकांना दाखवुन ‘तुम्ही जर पुढे आले तर मी तुम्हास जिवे मारीन’ अशी धमकी दिली होती. तसेच कामगाराला देखील ठार मारुन टाकु अस बोलुन दोघांनी पळ काढला होता. दोघां विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि जितेंद्र गिरनार, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.