न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- चाकण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील मिसिंग अदित्य भांगरे याच्या खुनाच्या गुन्हयाची उकल केली आहे. एका आरोपीस अटक करण्यात आले आहे. (दि. १८) रोजी रासे फाटा येथे मराठा हॉटेलमध्ये स्वप्निल शिंदे याच्यावर गोळीबार झाला होता. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होता.
चाकण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अमर नामदेव शिंदे (वय २५ वर्षे, रा. कासार आंबोली ता. मुळशी जि. पुणे) याला (दि. २३) रोजी ताब्यात घेतले होते. अमरकडे अधिक चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहीती दिली. रेकॉर्डवरील आरोपी राहुल पवार याचा भाऊ रितेश सजंय पवार याचा तीन महीन्यापुर्वी खुनाच्या छिन्न विछिन्न झालेल्या चेह-याचा फोटो आदित्य युवराज भांगरे (वय १८ वर्षे, रा. भांगरे वस्ती, म्हाळुंगे ता. खेड जि. पुणे) याने इंन्स्टाग्राम वर वारंवार स्टेटसला ठेवल्याच्या रागातुन राहुल पवारने कट करुन अमर शिंदे तसेच त्याचे इतर दोन सहकारी यांनी मिळुन (दि. १६) रोजी दुपारी अदित्य युवराज भांगरे याचे चारचाकी वाहनातुन अपहरण केले. त्याला वाहनामध्ये बेदम मारहाण करुन त्याचा वायरच्या सहायाने वाहनामध्येच गळा आवळुन खुन केला असल्याची कबुली दिली. अदित्य भांगरे हा बेपत्ता असल्याबाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. आरोपी अमर शिंदे याला कायदेशीर कारवाईसाठी म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले होते.
म्हाळुंगे पोलीसांनी आरोपीस अटक करुन गुन्हयाचा सखोल तपास केला असता आरोपी यांनी दिशाभुल करण्यासाठी मयताचा मोबाईल गोवा राज्य येथे सहभागी आरोपी सोबत पाठविला व अदित्य भांगरे यास निमगाव शिवारातील डोंगरामध्ये लाकडाचे सहायाने जाळल्याची माहिती दिली. सदर ठिकाणी मृतदेह जाळल्याच्या खुना दिसुन आल्या नाहीत, अधिक चौकशी करता आरोपीने कबुली दिली की, गुन्हयातील मयत अदित्य भांगरे याचे प्रेत महाराष्ट्र-गुजरात सिमेवर जंगलाध्ये जाळल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तपास पथक पाठवुन आरोपीने दाखविलेल्या ठिकाणावरुन प्रेताचे अर्धवट जळालेले अवशेष पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. गुन्हयातील मुख्य आरोपी राहुल पवार व इतर साथीदारांचा शोध घेणेकरीता पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडील पथके प्रयत्न करीत आहेत.