न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- दिघी परिसरामध्ये दुचाकी चोरणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी माग काढत त्यांच्याकडून एकूण २,८०,००० रू कि. च्या एकूण चार दुचाकी जप्त केल्या आहेत. दिघी पोलीस ठाणे येथील तीन गुन्हे व चाकण पोलीस ठाणे येथील एक गुन्हा उघडकीस आणला आहे. संतोष जयहिंद्र गुप्ता (वय १९ वर्षे, रा. शिंदे चाळ, खंडोबामाळ, भोसरी), आणि विधी संषर्षीत बालक यांना ताब्यात घेलते आहे.
दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक दुचाकीवर दोन इसम संशयितरित्या जात असताना दिसले. त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांना पाहून पळू लागले. तपास पथकाला संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग करून संशयित दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांनी दिघी पोलीस ठाणे येथील तीन मोटार सायकल व चाकण पोलीस ठाणे येथील एक मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांची कबुली दिली, त्याप्रमाणे त्यांचेकडून चार मोटार सायकल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.
चोरीस गेलेली ७०,००० रू. कि. ची एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा ६ जी मोपेड दुचाकी तिचा नं. एम.एच- १४-जे.के-१४१२, ७०,००० रू होंडा सीबी शाईन काळया रंगाची दुचाकी नं. एम-एच-२४-बी.डी-७२७८, चोरीस गेलेली ५०,००० रू. कि. ची होंडा सीबी ट्रीगर लाल रंगाची दुचाकी नं. एम. एच-१४-ई.जी-२२९७, चोरीस गेलेली ९०,००० रू कि. ची एक काळया रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटार सायकल नं. एम. एच-१४-जे.जे-५८७९ अशा एकूण २,८०,००० रू कि. च्या एकूण चार मोटार सायकल जप्त केली आहेत.