न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २६ एप्रिल २०१९) :- चिखली येथील ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शनिवार (दि २७) रोजी संध्या ५ ते ८ या वेळेत ‘जीटीआयएस बाल मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती मुख्याध्यापिका काजल छातीजा यांनी दिली. यावेळी डॉ. ललित धोका, डॉ स्वप्नाली धोका हे उपस्थित राहणार आहेत.
या बाल मेळाव्यात कार्टून कॅरेक्टर शक्तिशाली राजू, हॅम्ली, हत्ती, भालू यांना भेटता येणार आहे. रेखांकन स्पर्धा, रोमांचक गेम्स, वाद्य वादन स्पर्धा, रोबोट, वाद्य वाद्ययंत्रांवरील संगीत, ड्रम सर्कल, नाट्य कथा सांगणे, हस्तकला, नृत्य, टॅटू बनविणे, पोटरी तयार करणे आणि बरेच काही असणार आहे. प्रवेश मोफत आहे.











