- मोबाईल फोन फोडला म्हणून तवा डोक्यात घालून केला होता खून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२४) :- मोबाईल फोन फोडण्याच्या कारणावरुन चिडुन जावून फेटयाने व डाव्या हाताने गळा दाबुन तसेच उजव्या हातातील लोखंडी तवा डोक्यात मारुन कालु रकेवार (वय २३ वर्षे) याचा रामसिंग नावाच्या इसमाने खुन केला होता. याबाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपीने पलायन केले होते.
गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा तसेच चाकण बस स्टॅण्ड, म्हाळुंगे परीसरात तसेच पुणे रेल्वेस्टेशन परीसरात शोध घेतला. आरोपीचा मोबाईल फोन बंद असल्यामुळे तांत्रिक तपास करण्यामध्ये अडचणी येत होत्या. तपास टिमला राज्यातील व अंतरराज्यातील गोपनिय बातमीदाराकडून माहीती प्राप्त करुन सदर आरोपी हा त्याच्या मुळ गावी आला असल्याची माहीती मिळाली.
तात्काळ गुन्हे शाखा युनिट ३ कडील सदर तपास पथकाने आरोपीचे मुळ गावी रियाना, मध्यप्रदेश येथे जावून सदर आरोपीची ठावठिकाण्या बाबत गोपनिय माहीती काढून सदर आरोपी रामसिंग सुलतानसिंग गोंड (वय ३० वर्षे मुळ रा. रियाना ता. दमोह जि. दमोह राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. म्हाळुंगे ता. खेड जि. पुणे) हा अंधाराचा फायदा घेवुन शेतामध्ये लपुन बसल्याची माहीती काढुन आरोपीस ताब्यात घेण्याकरीता जात असताना आरोपीस चाहुल लागताच सदर आरोपी पळून जात असताना त्यास पथकाने पाठलाग करुन शिताफिने रियाना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीस म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.