न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने महावितरण कंपनीचे एकूण १ कोटी १० लाखांचे बिल थकविल्याचे समोर आले आहे. मात्र, महापालिकेच्या विविध विभागांनी बिले अदा केली असून, एवढी थकबाकी नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मालमत्ताकर व पाणीपट्टी थकल्याने महापालिकेकडून नळजोड खंडित करण्याची कारवाई केली जाते. त्याप्रमाणे महावितरण कंपनीकडून बिल थकल्यास वीजजोड खंडित केला जातो. मात्र, महावितरणचे बिल महापालिकेने वेळोवेळी अदा केले आहे. इतक्या रकमेचे बिल थकीत नाही, असे महापालिकेचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.
तर, विविध सरकारी संस्थांकडे महावितरणची बिले असतात. त्यांची बिले धनादेशाने होत असल्याने ते थकबाकीमध्ये दिसतात, असे महावितरणाचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी सांगितले.















