न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- बॅकेचा मॅनेजर आहे असे भासवत ‘मंजुर झालेले बजाज फायनान्सचे लोन डिसबस करतो’, असे सांगून त्यासाठी लागणारी प्रोसेस म्हणुन १०,००० रुपये व सेक्युरीटी म्हणुन कंपनीकडे जमा करावयाची रिफन्डेबल रक्कम १,००,००० रुपये अशी रक्कम त्याने बँक खात्यावर स्वीकारली. फिर्यादीची एक लाख दहा हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे.
ही फसवणुकीची घटना (दि २९/०३/२०२४) रोजी चरोली खुर्द, ता. खेड, जि. पुणे येथे घडली. फिर्यादी जालींदर माणीक गावडे यांनी आरोपी मो क्र ८८३०१५०४६५ वापरणारा आयडीबीआय खाते क्र १६४४१०४००००९४२३० या वरती पैसे स्वीकारणा-या त्याचे नाव आरडी असे सांगणा-या इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसांनी ९६/२०२४ भांदवि कलम ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ सी, ६६ डी प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि नरके पुढील तपास करीत आहेत.