न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- रियल्टी अॅण्ड इफ्रास्ट्रक्चर कंपनीला काम करण्यासाठी जागा हवी असल्याने फिर्यादी जागेचा शोध घेत होते. यातील आरोपीने त्यांच्याकडे १५ आर जागा असल्याचे सांगत जागेची किमंत ३,९०,००,००० रूपये ठरवली. ३० टक्के रक्कम घेवून इशार पावती देण्यासाठी फिर्यादीस विश्वासात घेवून फिर्यादीकडून १,२०,००,००० रूपये रक्कम बँकेतून आर. टी. जी. एस व्दारे स्वत: चे बॅक खातेवर घेतले.
दरम्यान त्याने जागेची इशार पावती करून दिलेली नाही किंवा पैसे परत दिले नाहीत, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि.१०/०१/२०२४ ते दि.०३/०४/२०२४) पर्यत आय. डी. एफ. सी फस्ट बँक शाखा, निगडी प्राधिकरण येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी प्रसाद प्रदीप कोंडे देशमुख (रा. धनकवडी) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. निगडी पोलिसांनी १६०/२०२४ भा.दं. वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वपोनि माळी पुढील तपास करीत आहेत.