- वंचित बहुजन आघाडीकडून दोन उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी रात्री दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. ही वंचितची सातवी यादी आहे. यात प्रामुख्याने मावळ लोकसभेतून माधवी जोशी व शिरुर लोकसभा मतदार संघातून अफताब अन्वर मकबुल शेख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. तर शिरुर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे तर महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.