- चिंचवडच्या दत्तनगरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२४) :- मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून २१ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून जीवंत ठार मारले आहे. सुरेश लोडबा ढेंबरे (वय २१ वर्षे) असं मयत तरुणाच नाव आहे.
हा प्रकार (दि.२१) रोजी सायंकाळी ५.३० वा. ते ७.०० च्या दरम्यान पोखरकर दवाखान्या जवळ, दत्तनगर, चिंचवड येथे घडला. या प्रकरणी मयताच्या महिला नातेवाईकाने आरोपी १) संतोष चौगुले (वय अंदाजे २५ वर्षे रा. दत्तनगर, चिंचवड), २) महिला आरोपी, ३) महिला आरोपी, ४) संतोषचा एक मित्र (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ३८७/२०२४ भा.दं.वि कमल ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ याला अटक केली आहे. पोनि गुन्हे बोबडे तपास करीत आहेत.