न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- पिंपळे सौदागर येथील स्वराज्य गार्डन हाॅटेलच्या किचनमध्ये शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. महापालिकेच्या मुख्य अग्निशामक केंद्राचे तसेच रहाटणी उप केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन बंबांच्या साहाय्याने एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत एक सिलेंडरचा स्फोट झाला. तसेच जवानांनी तीन सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले.
यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, हाॅटेलमधील साहित्याचे नुकसान झाले. सोमवारी (दि. २०) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.











