- निगडी ते सुदुंबरे या बसच्या दिवसभरात होणार तब्बल ३२ खेपा..
- ग्रामपंचायतीच्या वतीने पीएमपी बसचे स्वागत..
- असा आहे बसचा मार्ग अनं वेळापत्रक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरापासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर वसलेल्या तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावात पीएमपीची बससेवा अखेर सुरु झाली आहे. त्यामुळे स्थानिकांसह चाकरमान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आज रविवारी (दि. २३) रोजी सकाळी दहाच्या सुमारास निगडीहून सुटलेल्या पीएमपी बसचे सुदुंबरे गावात आगमन झाले.
दरम्यान सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने या पीएमपी बसचे स्वागत करण्यात आले. सरपंच मंगलताई कालिदास गाडे यांनी यांनी बसला हार आणि नारळ वाढवून निगडी ते सुदुंबरे पीएमपी बसचे उद्घाटन केले. यावेळी उद्योजक कालिदास गाडे, उपसरपंच बापूसाहेब बोरकर, मा. उपसरपंच ताराचंद गाडे, सुरेश नाना गाडे, अभियंते शैलेंद्र चव्हाण, उद्योजक विजय गुंजाळ, संताजी महाराज मंदिराचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव आणि गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना सरपंच मंगलताई गाडे म्हणाल्या, गावात केंद्र सरकारचे महत्वपूर्ण एनडीआरएफ केंद्र आहे. सिद्धांत कॉलेज नावाची मोठी शैक्षणिक संस्था येथे आहे. हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्यातून येथे येत असतात. तसेच चाकण आणि तळेगाव एमआयडीसीत कामाला जाणारा मोठा कामगार वर्ग देखील याच गावातून ये-जा करीत असतो. याशिवाय गावाला लागुनच भंडारा डोंगर, सूदवडी, वासुली, भांबोली आणि इतर गावांच्या सीमा आहेत. तिथे जाणारे देखील सुदुंबरे गावातूनच ये-जा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून गावात येण्यासाठी थेट पीएमपी बस नसल्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अशा महत्वपूर्ण गावात पीएमपी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत होती. अखेरीस त्याला यश आले आहे. ही ई-बस निगडीहून देहूरोड मार्गे गावात येईल. येथील सिद्धांत कॉलेजसमोर तिचा थांबा असेल. दोन्हीच्या मिळून एकूण ३२ खेपा बसच्या होणार आहेत. त्यामुळे गावात समाधानाचे वातावरण आहे.
निगडी ते सुदुंबरे पीएमपी बस क्रमांक ३२९/१ चा असा असेल दिनक्रम…
पहिली बस ही सकाळी ५.१५ वाजता सुटेल ती सुदुंबरे येथे सकाळी ६.०५ वाजता पोहोचेल. त्यांनतर सकाळी ७.०० निघणारी बस ८. ०० वाजता, सकाळी ९.०० वाजता निघणारी बस दहा वाजता तर सकाळी ११. ३० वाजता निघणारी बस दुपारी साडेबारा वाजता सुदुंबरे येथे पोहोचेल. त्यानंतर दुपारी २.२५ वाजता निगडीहून निघणारी बस सव्वातीन वाजता, तर सव्वाचार वाजता निघणारी बस सव्वापाच वाजता, सायंकाळी ६.१५ वाजता निघणारी बस सव्वासात वाजता आणि रात्री पावणेनऊला निघणारी शेवटची बस पावणेदहा वाजता सुदुंबरे येथे पोहोचेल.
निगडी ते सुदुंबरे पीएमपी बस क्रमांक ३२९/२ चा असा असेल दिनक्रम…
पहिली बस ही सकाळी ६.०५ वाजता सुटेल ती सुदुंबरे येथे सकाळी ६.५५ वाजता पोहोचेल. त्यांनतर सकाळी ७.५० निघणारी बस ८. ५० वाजता, सकाळी ९.५० वाजता निघणारी बस १०.५० तर दुपारी १२. २० वाजता निघणारी बस दुपारी १.२० वाजता सुदुंबरे येथे पोहोचेल. त्यानंतर दुपारी ३.०५ वाजता निगडीहून निघणारी बस चार वाजता, तर ४.५५ वाजता निघणारी बस सायंकाळी ५.५५ वाजता, सायंकाळी ६.५५ वाजता निघणारी बस ७.५५ वाजता आणि रात्री साडे नऊला निघणारी शेवटची बस दहा वाजता बावीस मिनिटांनी सुदुंबरे येथे पोहोचेल.
असा असेल मार्ग…
निगडी पवळे चौक, निगडी, भक्ति शक्ति गार्डन, पुना गेट परमार कॉम्प्लेक्स, कोईमा लाईन, बी सब डेपो, केंद्रीय विद्यालय देहू रोड, गार्डन सिटी, सीआयएसव्ही देहूरोड, देहू रोड स्टेशन, देहूगांव फाटा देहू रोड, अशोक नगर देहू, चिंचोली, महादेव मंदीर पादुका, तुकाराम पार्क, सीओडी डेपो, झेंडेमळा, राधा कृष्ण लॉन्स, माळवाडी देहू, कृष्णकुंज सोसायटी, परंडवाल चौक, देहूगांव ग्रामपंचायत, देहूगांव, कॉर्नर हॉटेल सांगुर्डी, वात्सल्य वृध्दाश्रम सांगुर्डी, देहू मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, दिगंबरा चौक येलवाडी, येलवाडी, देहू फाटा चाकण रोड, कुंजरी लॉन्स, सुदूंबरे गांव फाटा, गाडे वस्ती सुदुंबरे, गणेश नगर सुदूंबरे, गणेश मंदिर सुदूंबरे, पाण्याची टाकी सुदुंबरे, सुदूंबरेगांव, छत्रपती शंभु राजे चौक सुदुंबरे, सिध्दांत कॉलेज सुदुंबरे.
निगडी ते देहूगांव या मार्गाचा विस्तार करून बस मार्ग क्र. ३२९ सदुंबरे (सिध्दांत कॉलेज) पर्यंत प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. तीचे सुधारित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. वाहतुक विभागाकडील विशेषतः निगडी डेपोकडील सर्व चालक-वाहक, गेरेज सुपरवायझर, टाईमकिपर तसेच आगार व्यवस्थापक यांना याबाबत कळविण्यात आले आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे रविवारपासून त्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. – मा. सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि…