- ‘सीएमई’तुन जाणारा नवीन पूल पुढील महिन्यात होणार वाहतुकीसाठी खुला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२४) :- बोपखेल गावासाठी दापोडी येथुन सीएमई हद्दीतुन जाणारा रस्ता मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दि.१३/०५/२०१५ रोजी बंद करणेत आल्यामुळे बोपखेल गावातील रहिवाश्यांना दापोडीकडे जाण्याकरीता पुर्वी लागणारे २ कि.मी. चे अंतर रस्ता बंद झाल्यामुळे सुमारे १६.०० कि.मी. झाले आहे. पुलाचे काम ९८ टक्के पुर्ण झाले असुन ऑगस्ट २०२४ अखेरीस पुल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन आहे.
बोपखेल येथील नागरीकांना पुणे कडे ये-जा करणेसाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरुन सुमारे १५ ते १६ कि.मी. अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थी व कामगारांची मोठी गैरसोय होत होती. दि.२०/०७/२०१९ रोजी सदर ठिकाणी पुल बांधणेकरीता निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार मे.टी.अँड टी. इन्फ्रा लि. यांना कामाचे आदेश देणेत आले.
पुलाच्या जागेमध्ये संरक्षण विभागाच्या आस्थापना व वसाहतीसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या येत असलेल्या महापारेषण विभागाच्या अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या व मनो-या मुळे कामास अडथळा निर्माण झाला होता. सद्यस्थितीत सदर उच्च दाब विद्युत वाहिन्या व मनोरे दि.१८/०५/२०२४ रोजी स्थलांतरीत करणेत आलेले असुन अनुषंगिक स्थापत्य विषयक कामे पूर्णत्वाकडे आहेत.
या प्रकल्पामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना २.९ कि.मी. अंतरावर खडकी कॅन्टोमेंट भागातुन पिंपरी चिंचवड व पुणे शहराकडे ये-जा करणेस सुलभ होणार आहे. परिणामी नागरिकांचा वेळ व इंधन खर्च वाचणार असुन पर्यावरणाचा समतोल राखता येईल.
“पुलाचे काम पूर्णत्वाकडे आहे लवकरच वाहतुकीसाठी खुला करणेत येणार आहे. संरक्षण खात्याशी व वाहतूक पोलिस अधिकारी यांचेशी समन्वय साधून नियोजन करणेत येत आहे. बोपखेल येथील नागरिक व कामगार यांची सोय होणार तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये बचत होणार आहे याचा आनंद आहे.”
-प्रमोद ओंभासे सह शहर अभियंता, प्रकल्प विभाग
- निविदा रक्कम : र.रु.४५,४६,३९.१२२/-
- निविदा स्विकृत रक्कम : र.रु.५३,५३,३७,५९४/- (Royalty + Material Testing)
- ठेकेदाराचे नाव : मे.टी अँड टी इन्फ्रा लि.
- सल्लागाराचे नाव : मे. स्तुप कन्सल्टंट प्रा.लि.
- आदेशाची तारीख : दि.२०/०७/२०१९
- कामाची मुदत : २४ महिने (मुदतवाढ दि.१७/११/२०२४ पर्यंत)
- पुलाची लांबी- १८५६.०० मी.
- पुलाची रुंदी- ८.४० मी.
- पोहच रस्त्यांची लांबी
- बोपखेल बाजु- ५८.०० मी.
- खडकी बाजु- २६२.०० मी.












