- नवीन प्रशस्त जागा मिळाल्यामुळे नागरिकांची गैरसोयीपासून सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२४) :- पिंपरी कॅम्प येथील अप्पासाहेब ऊर्फ पुरुषोत्तम नामदेव कर्णे बालभवन येथे असलेल्या सह दुय्यम निबंधक हवेली १८ व हवेली २६ कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर झाले आहे. कार्यालयाला नवीन प्रशस्त जागा मिळाल्यामुळे नागरिकांची गैरसोयीपासून सुटका होणार आहे. तीन जूनपासून आकुर्डी येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये या कार्यालयाचे स्थलांतर झाले.
पिंपरी कॅम्प येथे दोन कार्यालयाचे कामकाज सुरू होते. या ठिकाणी जागा अपुरी पडत होती. दोन्ही कार्यालयांना जागा पुरेशी उपलब्ध नव्हती. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. सुमारे ३० ते ४० दस्त नोंदणीसाठी दाखल होतात. दोन्ही कार्यालयांसाठी एकच अभ्यागत कक्ष होता. तीन व्यक्ती बसतील असे तीनच बाक होते. काम लवकर न झालेल्या नागरिकांना तासनतास थांबावे लागत होते. महसूल कार्यालयाच्या आतही अपुऱ्या जागेत दाटीवाटीने उभे राहण्याची वेळ नागरिकांवर येत होती.
दोन्ही कार्यालयांच्या बाहेरील बाजूस मधोमध महिला व पुरुष स्वच्छतागृह असून, त्याची दुरवस्था झालेली होती. नळ तुटलेले होते. या गैरसोयींमुळे येणारे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत होते.
या कार्यालयाचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या संबंधित विभागाकडे होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. आकुर्डी येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये नियोजित जागा ठरविण्यात आली. या ठिकाणी तीन जूनपासून कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“तीन जूनपासून कार्यालयाचे आकुर्डीतील म्हाडाच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी पुरेशी व्यवस्था आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही.
– सखाराम गबाले, उपनिबंधक…
—