न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १७ जुलै २०२४) :- धरणातील पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवड शहरासाठी नेण्यास मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. तसेच, ९ ऑगस्ट २०११ रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोर्चा काढला होता. या वेळी पोलिस गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ तळेगाव दाभाडे शहरात करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सर्वांना वडगाव मावळ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी निर्दोष मुक्तीचे आदेश दिले आहेत.
पवना धरणातून बंद पाईप लाईनद्वारे पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा योजनेला विरोध करण्यासाठी ९ ऑगस्ट २०११ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे येथे भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष भास्करराव म्हाळस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बंद पुकारला होता. या वेळी आंदोलकांनी दोन पीएमपी बस आणि अन्य एका वाहनावर दगडफेक केली होती. त्यात बसमधून प्रवास करणाऱ्या दोन मुली जखमी झाल्या होत्या.
दोषमुक्त झालेले कार्यकर्ते…
निलेश येवले, गणेश भेगडे, प्रकाश ओसवाल, सूर्यकांत गरुड, सागर टकले, राकेश भोर, धनंजय सोरटे (देशमुख), सुनील मोरे, अनिल भांगरे, प्रशांत शिळीमकर, सुनील कांबळे, सतीश गरुड, संदीप भेगडे, विशाल गायकवाड, अरुण भेगडे, लक्ष्मण माने, अजय भेगडे, रजनी भोलासिंग उर्फ विश्वनाथ ठाकूर.












