- स्टेअरिंगचा ताबा घेत आडवी तिडवी बस चालवून रस्त्यावरील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२४) :- दोघांनी दारुच्या नशेत येवुन पीएमपीएमएलच्या चालत्या बसला हात दाखवला. बस थांबवुन बसमध्ये घुसले. आत येवुन बस चालकाला शिवीगाळ केली. चालकाच्या कॅबिनमध्ये घुसुन एकाने मोठ मोठ्याने आरडा ओरडा केला ” तु शांत बस, आम्हांस शिकवतोस का” आम्ही सुध्दा बस चालक आहोत, तु आम्हांस शिकवु नकोस” असे म्हणत दोघांनी मिळुन चालकाच्या हातातील चालु बसचे स्टेअरिंग त्यांच्या हातात धरुन ओढले.
बस वाकडी तिकडी झाली. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांना व पादचारी इसमांना बस धडकुन अपघात होऊ शकतो, तरीही दोघांनी असे कृत्य केले. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करुन, त्यांचे गचुंडे धरुन हाताची नखे मानेला ओरखडुन रक्त येवून फिर्यादी यांना जखमी करुन बसमधील लोकांनाही शिवीगाळ केली.
हा प्रकार (दि. १७) रोजी दुपारी १:२० च्या सुमारास पीएमटी चौक, तृप्ती चायनिज हॉटेल समोर व थोडे पुढे घडला. फिर्यादी सचिन गुणाजी पारधे यांनी आरोपी १) संतोष जाधव (वय ४० वर्ष रा. भोसरी), २) जितेश रमेश राठोड (वय ३६ वर्ष रा. महाळुंगे चाकण) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी ४४५/२०२४, भा.न्या.स. कलम १२६ (२),१२५,२९६,११५ (२),३५२,३५१ (२), (३), ३(५). मपोकाकलम ११२/११७, मप्रोव्ही कलम ८५ (१) प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा तिटकारे तपास करीत आहेत.


















